satyaupasak

‘बारामतीत मला दर महिन्याला बोलवत जा कारण…’, पंकजा मुंडे यांचा अजितदादांना खास सल्ला

**बारामतीतील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी पंकजा मुंडे यांनी अजित पवारांचे कौतुक करताना म्हटले, ‘आज अजितदादांबरोबर काम करत असताना माझ्या आयुष्यातील सकाळ कधीच एवढी योग्य कामासाठी गेली नव्हती. तीन-चार कप चहा पिण्यात गेली. डोकं खराब करणाऱ्या बातम्या ऐकण्यात गेली.’

अजित पवार यांच्या वक्तशीरपणा आणि शिस्तीविषयी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मला अजित पवार म्हणाले आपण पावणे आठला भेटू. पण मला वहिनींचा फोन आला की आपण सव्वा सातला तयार रहा आणि साडेसातलाच या… मी यायला सात एकतीस झाले, पण दादा आधीच गाडीत बसले होते. मी धावत गाडीत जाऊन बसले. मला असं वाटलं, बारामतीत मला दर महिन्याला बोलवा, कारण इथलं Professionalism मला शिकता येईल.’

बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राचे कृषी प्रदर्शन आजपासून सुरू झाले आहे. हे प्रदर्शन 16 ते 20 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले असून राज्यातील शेतकऱ्यांना ते पाहण्याची संधी मिळणार आहे.*

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *